32.3 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home Top News “नव्या संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा,“लोकसभेत घुसून त्या दोन तरुणांनी जो पिवळा धूर...

“नव्या संसद भवनाच्या सुरक्षेत हलगर्जीपणा,“लोकसभेत घुसून त्या दोन तरुणांनी जो पिवळा धूर पसरवला तो..”

0
36

blank

संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून आज लोकसभा सभागृहात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेचे कामकाज सुरू असताना दोन अज्ञात इसमांनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या घेतल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत दोन व्यक्ती लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. यावेळी त्यांच्या हातात दोन कॅन होते, ज्यातून पिवळा धूर निघत होता. खासदारांनीच या दोघांना पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण हा धूर जर विषारी असता तर मोठा अनर्थ घडला असता, अशी प्रतिक्रिया खासदारांनी दिली आहे. तसेच संसदेची नवी इमारत सुरक्षेच्यादृष्टीने इतकी कमकुवत कशी? असाही प्रश्न विरोधी खासदारांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पिठासीन राजेंद्र अग्रवाल यांनी लोकसभा दोन वाजेपर्यंत स्थगित केली आहे.

लोकसभेत काही वेळापूर्वीच दोन तरुण घुसले होते. त्यामुळे एकच गदारोळ झाला. या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. संसद भवनावर झालेल्या हल्ल्याला आजच २० वर्षे पूर्ण झाली. आजच्याच दिवशी लोकसभेत दोन तरुण शिरले होते. त्यांनी खासदारांच्या बाकांवरुन उड्या मारल्या आणि पिवळ्या रंगाचा धुराचे नळकांडे घेऊन ते आले होते. या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याविषयी माहिती दिली आहे. blank

आम्ही या घटनेची चौकशी करतो आहोत

“या घटनेबाबत आम्ही कुणालाही दोष देत नाही. आम्ही या घटनेची चौकशी करतो आहोत. लोकसभा अध्यक्ष म्हणून ही माझी जबाबदारी आहे. मी या घटनेची स्वतः चौकशी करतो आहे, कोण लोक आले होते याची माहिती मी घेतो आहे. जो विषय खासदार मांडत आहेत ती चिंता आम्हाला सगळ्यांना आहे. प्राथमिक तपासानंतर दोघांनाही पकडण्यात आलं आहे. त्यांच्याकडे ज्या ज्या गोष्टी होत्या त्या जप्त करण्यात आल्या आहेत. जे दोन लोक बाहेर होते त्यांनाही अटक करण्यात आली आहे.”

तो धूर विषारी असता तर…

काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांनी सभागृहात घडलेला प्रसंग कथन केला. ते म्हणाले, “दोन लोकांनी प्रेक्षक गॅलरीतून लोकसभा सभागृहात उडी मारली. त्यांच्या हातात कॅन होते. त्यातून पिवळा धूर येत होता. दोघांपैकी एक जण अध्यक्षांच्या आसनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. दोघेही काहीतरी घोषणा देत होते. पण त्या मला समजू शकल्या नाहीत. पण दोन लोक सुरक्षा भेदून आतमध्ये येतात, सभागृहात उड्या मारून धूर सोडतात, याला काय म्हणायचे. कदाचित हा धूर विषारीही असला असता किंवा स्मोक बॉम्बही असू शकला असता. आजच्या दिवशीच १३ डिसेंबर २००१ रोजी संसदेवर हल्ला झाला होता. त्यामुळे याच दिवशी पुन्हा अशाप्रकारे घुसखोरी होणे, हे खूपच गंभीर आहे.”

blank