
चंद्रपूर : वन्यप्राण्यांसाठी शेतात लावून ठेवलेल्या विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाल्याने लताबाई लाटकर (५५) व देवीदास इष्टम या दोघांचा मृत्यू झाला. या दोन्ही घटना आज, गुरुवारी दुपारी उघडकीस आल्या. सिंदेवाही तालुक्यातील वासेरा गावात महेश बोरकर यांच्या शेतात लताबाई लाटकर कामाला गेल्या होत्या. काम करतानाच त्यांचा विद्युत प्रवाहित तारांना स्पर्श झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.





