नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करा – पालकमंत्री

0
15

. आमगाव येथील जनता दरबारात पालकमंत्र्यांनी एैकल्या नागरिकांच्या समस्या

     गोंदिया, दि.23 : अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी तहसिल कार्यालय आमगाव येथे आयोजित जनता दरबारात जनतेच्या तक्रारी व समस्या जाणून घेतल्या व प्रशासनाला नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे निर्देश दिले.

         जनता दरबारात प्राप्त तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी संबंधीत विभागाने चौकशी करुन कालबध्द कार्यक्रम तयार करुन प्रकरणे निकाली काढावे असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, माजी आमदार राजेंद्र जैन, उपविभागीय अधिकारी सत्यम गांधी, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         यावेळी मनरेगाची कामे, योजनांचा लाभ, आरोग्य सेवा बळकटीकरण, समाज मंदिर बांधकाम, लोक-कलाकारांना मानधन, जि.प.प्राथमिक शाळा माल्ही येथे शौचालय बांधकाम, चिरचाळबांध परिसरातील ब्लास्टींग व डांबर प्लांटमुळे नागरिकांना धोका असल्यामुळे सदर काम बंद करण्यात यावे, वन जमीन पट्टे, शेतकऱ्यांना बोनस, जि.प.घड्याळी तासिका शिक्षकांना मानधन वाढ, पांदन रस्ते, सोनपुरी येथील अतिक्रमण, सभा मंडप बांधकाम, आसोली ते कालीमाटी रस्ता बांधकाम, रोजगार निर्मिती, कृषि योजनांचा लाभ, शेतीच्या तक्रारी, सिंचन, विद्युत विभागाचे प्रश्न यासह नागरिकांनी विविध समस्या व तक्रारी पालकमंत्र्यांकडे मांडल्या. नागरिकांच्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिले.

        जनता दरबारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून आपल्या तक्रारी व समस्या मांडल्या. नागरिकांच्या सर्व समस्या व तक्रारींची चौकशी करुन प्रकरणे तातडीने निकाली काढण्यात येतील असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

        जनता दरबारात पालकमंत्र्यांच्या हस्ते 05 क्षयरुग्णांना फुड बास्केट वाटप तसेच 02 लाभार्थ्यांना रु.5 लाखाचे विमा संरक्षण बाबतचे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे कार्ड आणि सिकलसेलच्या 02 रुग्णांना कार्ड वाटप करण्यात आले. आमगाव तालुक्यातील 03 लाभार्थ्यांना वैयक्तिक वनहक्क पट्टे व 06 लाभार्थ्यांना सामुहिक वनहक्क पट्टे वाटप. तसेच सालेकसा तालुक्यातील 07 लाभार्थ्यांना वैयक्तिक वनहक्क पट्टे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे मोदी आवास घरकुल योजना 2022-23 अंतर्गत 10 लाभार्थ्यांना आवास मंजुरीचे पत्र वाटप करण्यात आले.

        जनता दरबारात उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार आमगाव रमेश कुंभरे, तहसिलदार सालेकसा नरसय्या कोंडागुर्ले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.नितीन कापसे, गटविकास अधिकारी अर्चना अयाचित, पोलीस निरीक्षक युवराज पांडे, तालुका कृषि अधिकारी आमगाव एम.जे.डिहारे, तालुका कृषि अधिकारी सालेकसा धनराज तुमडाम, विस्तार अधिकारी सांख्यिकी वैशाली खोब्रागडे, पीपीएम समन्वयक प्रज्ञा कांबळे व नागरिक मोठ्या संख्यंने उपस्थित होते.