गोरेगाव :- तालुक्यातील सलंगटोला येथे लग्न समारंभात सहभागी झालेल्या युवकाची हत्या करून मृतदेह तलावात फेकून दिले. ही घटना आज, २९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली असून सुनील मदन नेवारे (२६) असे मृतकाचे नाव आहे. मृतक सुनील हा रापेवाडा येथील रहिवासी होता. मृतक सुनिल हा २६ फेब्रुवारीला सलंगटोला येथे लग्न समारंभात सहभागी झाला होता. खोडशिवनी येथून लग्न सोहळा आटोपून वर-वधूसोबत तो सलंगटोला येथे परत आला.
परंतु पहाटेपर्यंत वर-वधूसोबतच असलेला मृतक सुनिल नेवारे अचानक बेपत्ता झाला. तसेच सुनील बेपत्ता झाल्याच कळताच गावात ठिकठिकाणी शोधाशोध सुरु झाली, परंतु सुनील दिसेनासा झाला, अशातच सलंगटोला गावशिवारातील तलावात अचानक त्याचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी दोन ते तीन जणांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास गावातील पोलीस अधिकारी करत आहेत.