1022 महिलांनी जाणून घेतले आपल्या मतदानाचे संविधानिक अधिकार.

0
9

सामाजिक कार्यकर्ता अश्विनसिंह गौतम यांचे अभिनव उपक्रम

अर्जुनी/मोर:- लोकशाही मध्ये आपले अधिकार आणि कर्तव्य यांची प्रत्येक स्त्रीला जाणीव असणे खूप गरजेचे आहे.लोकशाही मधला सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक. अनेक महिलाना त्यांचे अधीकार माहिती नसल्याने त्यांचे अधिकार माहीत व्हावे या करीता प्रत्यक्ष संविधान पुस्तिका सोबत घेऊन सावित्री बाई फुले जयंती(3जानेवारी 2024)पासून तर जागतिक महिला दीन(8मार्च2024) पर्यत घरोघरी जाऊन प्रत्येक महिलेला,तरुणीला त्यांना  संविधानातील अनुच्छेद 325 आणि 326 अनुसार मतदानाचे अधिकार दिले.आपल्या अधिकाराचा पूर्ण वापर लोकशाहीला मजबूत करण्याकरिता करावा या बाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ता अश्विनसिंह गौतम यांनी महिलांना माहिती देऊन जन जागृती केली. या अभियाांतर्गत तब्बल 621कुटुंबातील 1022 महिलांनी आपले मतदानाचे अधिकार जाणून घेतले. अश्विनसिंह गौतम यांनी चालविलेल्या अभियानात अनेक महिलांनी प्रथामताच संविधान पुस्तिका बघत असल्याचे अनुभव व्यक्त केले. गौतम यांनी केलेल्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.