
मुंबई दि.11 (प्रतिनिधी)- मुंबईतील अंधेरी पूर्वे एम.आय.डी.सी तील एमटीएनएल कार्यालय सेंट्रल रोड लगत आंबेडकर चौकाच्या बाजूला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अन्यथा गैर आंबेडकरी राजकीय पुढाऱ्यांना यावर्षी अभिवादन करण्यास मज्जाव करण्यात येईल असा ईशारा विद्रोही पत्रकार पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांनी दिला आहे.
समाजभूषण डॉ. माकणीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन केले आहे की, एमआयडीसी परिसरातील डॉ. आंबेडकर चौकात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा तसेच या 14 एप्रिल 2024 रोजी आधुनिक भारताच्या पित्याची म्हणजेच बाबासाहेबांच्या 133 व्या भीमजयंती निमंत्ताने अभिवादन करताना तात्पुरता पुतळा बसविण्यात येईल तो पुतळा पूर्णाकृती पुतळा कायम बसवे पर्यंत काढण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे.
तसेच डॉ. माकणीकर यांनी स्थानिक राजकारण्यांना प्रसिद्धी माध्यमाद्वारे ठणकावून सांगितले आहे की, पूर्णाकृती पुतळा एम.टी.एन.एल च्या जागेत बसविण्यास सरकारला भाग पाडण्यास सर्वांनी एकत्र यावे व कोणतेही राजकारण न करता या 14 एप्रिल ला पूर्णकृती पुतळा उभा राहील असं प्रशासकीय आदेश मिळवावेत.
अन्यथा आंबेडकरी मतांचा जोगवा मागण्यासाठी केवळ दिखावा करणाऱ्या गैर आंबेडकरी राजकारण्यांनी आंबेडकर चौकात अभिवादन करण्यास येऊ नयेत शिवाय येऊ घातलेल्या निवडणुकीत मताची भीक मागण्यास आंबेडकर अनुयायाच्या दारी येऊ नये आणि आलेच तर तो राजकारणी गुण्या गोविंदाणे परत जाणार नाही याची नोंद घ्यावी असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिला असून पुढे कायदा व सुव्यवस्था बाधित झाली तर शासन व प्रशासन जवाबदार असेल असे म्हटले आहे.