बहुजणानो संघर्ष, त्याग आणि बलिदानासाठी सज्ज रहा -अजाब शास्त्री

0
20

गोंदियात कांशीराम जयंती उत्साहात

सर पे चढके बोल रहा है जादू कांशीरामका
मैफल रंगली

गोंदिया ता.16 मार्च :-देशात आंबेडकरवाद जिवंत ठेवायचे असेल तर बहुजनानो संघर्ष, त्याग आणि बलिदानासाठी सज्ज रहा असे आवाहन बहुजन समाज पक्षाचे ज्येष्ठ नेते अजाबलाल शास्त्री यांनी (ता.15) केले.येथील भीमनगरच्या मैदानावर बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यवक्ता म्हणून ते बोलत होते.
मंचावर जिल्हा अध्यक्ष सुनील भरणे, प्रदेश नेते पंकज वासनिक, डॉ. लोकेश तूरकर, नरेंद्र मेश्राम, नानाजी शेंडे, अनिल बावणे,मोहसीन खान,आणि डॉ आंबेडकर सार्व. जयंतीचे अध्यक्ष गेंदलाल तिरपुडे उपस्थित होते.
शास्त्री पुढे म्हणाले, यावर्षी होणारी लोकसभेची निवडणूक ही अंतिम निवडणूक आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कलम 326 मध्य दिलेल्या मताधिकारामुळे आम्हाला स्वाभिमानाचे दिवस आले.जर फुले आंबेडकरी विचारांचा पराभव झाला तर आता साक्षात डॉ.बाबासाहेबही येणार नाहीत आणि कांशीराम साहेब पण येणार नाहीत.त्यामुळे ही लढाई आम्हाला लढावी लागणार आहे.
ते पुढे म्हणाले देशात मनुवाद आणि आंबेडकरवाद हे दोनच वाद आहेत. काँग्रेस, भाजप, राका, शिवसेना हे पक्ष मनुवादाचे पक्षधर असून फक्त बहुजन समाज पक्ष हाच आंबेडकरवादाचा पुरस्कर्ता आहे.कदाचित आमचा ‘वक्त’ वाईट असेल परंतु रक्त शसक्त आहे असे सांगून शास्त्री म्हणाले आमची ED च्या चाकूला घाबरून पळून जाणारी जमात नाही.त्यांनी हिंदुराष्ट्र संकल्पनेवर जोरदार हल्ला चढविला ते म्हणाले सतीप्रथा, अश्पृश्यता आणि वर्णवाद म्हणजेच हिंदुराष्ट्र होय. परिणामी 20 वर्षात बहुजनांचे शिक्षण बंद होऊन पुनःसच गुलामी उदयास येईल अशी भिती त्यांनी व्यक्त केली.यावेळी संगीतमय मैफल चांगलीच रंगली, संगितकार प्रकाश सागर यांनी सादर केलेले गित
सर पे चढकर बोल रहा है जादू कांशीरामका!
बुद्ध, कबीर फुले शाहू धरोहर ज्ञानकी!
अब आशाकी किरण बनी है मायावती!!
या गीतांमुळे उपस्थित प्रेक्षकांनी जबरदस्त दाद दिली.संपूर्ण वातावरण बसपामय झाले.मान्यवर कांशीराम साहेबांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.संचालन महासचिव उत्तम मेश्राम यांनी तर आभार जिल्हाध्यक्ष सुनील भरणे यांनी मानले. यावेळी मोठया संख्यने जनसमुदाय उपस्थित होता.