तहसील कार्यालय मंगरूळपीर येथे आपत्ती व्यवस्थापन एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न

0
47
वाशिम,दि.25P जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलनागपूर व तहसील कार्यालय मंगरूळपीर यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जून रोजी तहसील कार्यालय मंगरूळपीर येथे तालुका स्तरीय आपत्ती व्यवस्थापनाचे पूर, विज, आग, रस्ते अपघात, सर्पदंश या विषयी एक दिवसीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
      प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी श्री दराडे यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थिती तहसीलदार श्रीमती शितल बंडगर, प्रमुख पाहुणे गट विकास अधिकारी श्री सोनवणे,प्रमुख मार्गदर्शक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार श्री बोंडे,राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल नागपूरचे पोलीस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक श्री जयस्वाल आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्री.भगत, श्रीमती बंडगर , श्री .यादव‌ व त्यांच्या चमूने प्रात्यक्षिकासह उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन उपविभागीय अधिकारी श्री दराडे यांनी केले.
सदर प्रशिक्षणाला सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी,तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आरोग्य सेवक/सेविका, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर व विविध विभागाचे कर्मचारी,तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.