34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता बांधकाम विभागाचे मेश्राम आणि किटूकले एसीबीच्या जाळ्यात अडकले…

बांधकाम विभागाचे मेश्राम आणि किटूकले एसीबीच्या जाळ्यात अडकले…

0
3963

blank

अमरावती,दि.०२- “नाली बांधकामा”चे देयक मंजूर केल्याचा मोबदला म्हणून १ लाख रुपयाची लाच मागून ७२ हजाराची लाच स्विकारणार्या सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग अमरावतीच्या अधिकार्यांना एसीबीसीने आज २ जुर्ले रोजी ताब्यात घेतले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या मध्ये सुनील विठ्ठलराव मेश्राम,५४ वर्षे, पद-उपविभागीय अधिकारी , (वर्ग- ०१) नेमणूक-सार्वजनिक बांधकाम विभाग बडनेरा जि.अमरावती आणि  वृषभ गजानन किटुकले,पद ज्युनिअर इंजिनियर,(वर्ग -२ )नेमणूक- सार्वजनिक बांधकाम विभाग,बडनेरा विशेष प्रकल्प, अमरावती,२८ वर्ष,रा.अर्जुन नगर,बोबडे कॉलनी दत्तवाडी,अमरावती यांना फिर्यादी कडून ७२,००० रूपये लाचेची रक्कम स्वीकारत असताना पंचांसमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले.
तक्रारदार यांनी प्रत्यक्ष एसीबीच्या कार्यालयात येवून दि.२८/६/२०२४ रोजी तक्रार दिली की ते कंत्राटदार असून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प अमरावती मार्फत नांदगाव खंडेश्वर येथे केलेल्या “नाली बांधकामा”चे देयक मंजूर केल्याचा मोबदला म्हणून सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प अमरावती येथील सुनील विठ्ठलराव मेश्राम,उपविभागीय अधिकारी व  ऋषभ गजानन किटुकले,पद-ज्युनिअर इंजिनियर हे त्यांना १,००,००० रुपये लाचेची मागणी करीत आहेत. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी देण्यात आलेल्या तक्रारीची दि.१/७/२९२४ रोजी करण्यात आलेल्या पडताळणी क्र.१ दरम्यान कीटूकले यांने स्वतः करिता ४२,००० रुपये व मेश्राम याचे करिता ३०,००० असे एकूण ७२,००० रुपयांची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.तसेच सुनील मेश्राम याने पडताळणी क्र.२ मध्ये स्वतःसाठी ३०,००० रुपये लाचेची मागणी करून किटूकले याचे कडे देण्यास सांगितले.
त्यावरून आज सोमवार दि.१/७/२०२४ रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईमध्ये कीटूकले याने फिर्यादी कडून ७२,००० रुपये पंचांच्या समक्ष स्वीकारल्याने दोन्ही लाचखोरांना जेरबंद करून ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन गाडगे नगर,अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    सदरहू कारवाई मिलींद बहाकर व मंगेश मोहोड,पोलीस उपअधीक्षक, अमरावती यांचे मार्गदर्शनात सापळा व तपास अधिकारी केतन मांजरे पोलीस निरीक्षक,अमरावती यांच्या नेतृत्वातील कारवाई पथकातील पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे,पोलिस निरीक्षक प्रवीपाटील, पो.अंमलदार, महेंद्रसाखरे,वैभव जायले,अभिजीत उमक व उमेश बोपते यांनी यशस्वी केली.

blank