
तर एसटी बसचे दोन्ही चालक गंभीर
रायगड:-अलिबाग रेवदंडा मार्गावर बेलकडे फाटा येथे वळणावर दोन एसटी बसला भीषण अपघात घडल्याची घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दोन चालक गंभीर जखमी झाले असून १८ ते २० प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
दोन्ही बसचे चालक हे गंभीर जखमी झाले असून एकाचे पाय तुटले असून दुसऱ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जखमींना तत्काळ अलिबाग जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलेले आहेत. घटनास्थळी पोलिस तसेच एस टी प्रशासन, स्थानिक यांनी धाव घेऊन जखमींना मदत केली आहे.
महाजने रेवदंडा ही बस रेवदंडाकडे जात होती. तर मुरुड बार्शी ही बस अलिबागच्या दिशेने येत होती. आक्षी येथील वळणावर दोन्ही बस समोरासमोर आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून एकमेकाला धडक दिली. यामध्ये महाजने रेवदंडा बसच्या चालकाच्या पायाला तर बार्शी बसच्या चालकाला पायाला गंभीर दुखापत झाली आहे. बसमधील १८ ते २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
अपघाताचे वृत्त कळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अपघातग्रस्तांना मदत केली. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. किरकोळ जखमी प्रवाशांना उपचार नंतर सोडण्यात आले आहे. अपघातामुळे वाहतूक विस्कळित झाली होती, त्यामुळे पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली.
तर काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली होती त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. या अपघातामुळे अलिबाग रेवदंडा मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ही वाहतूक पर्यायी, मार्गाने वळवली. हा अपघात नेमका कशामुळे आणि कसा झाला याची माहिती मिळू शकलेली नाही. या प्रकरणाची माहिती मिळाल्यावर रायगड पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच या मार्गावर झालेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. या अपघात प्रकरणी रायगड पोलीस अधिक तपास करत आहेत.





