36 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home गुन्हेवार्ता उज्वल मेश्राम खुन प्रकरणात कल्लू यादवला अटक

उज्वल मेश्राम खुन प्रकरणात कल्लू यादवला अटक

0
1606

blank

गोंदिया दि.०७: पोलीस ठाणे गोंदिया शहर अंतर्गत  येत असलेल्य़ा कुंभारे नगर अंबेडकर भवन, येथील खून प्रकरणात माजी नगरसेवक लोकेश यादवला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. सविस्तर, असे क पोलीस ठाणे गोंदिया शहर अंतर्गत कुंभारे नगर अंबेडकर भवन गोंदिया येथे दिनांक 18-06-2024 चे 21.30ते 21.50 वाजता दरम्यान  दद्दू उर्फ उज्वल निशांत मेश्राम याचा खून करण्यात आलेला होता… सादर प्रकरणी पो. ठाणे गोंदिया शहर येथे..अपराध क्रमांक 392/2024 कलम 302, 120, ब भादवी, सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये दाखल असून गुन्ह्यात यापूर्वी आतापर्यंत 7 आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे.य़ा प्ररकरणात मृतकाच्या आईने माजी नगरसेवक कल्लू उर्फ लोकेश यादववर आरोप करीत अटकेच्या मागणीला घेऊन मोर्चा पण काढला होता.त्यानंतर पोलिसांनी  आज सदर गुन्ह्यात लोकेश उर्फ कल्लू सुंदरलाल यादव वय 42 वर्षे राहणार- यादव चौक गोंदिया य़ास आज दिनांक 07 जुलै 2024 चे 19.39 वाजता गुन्ह्यात अटक केली.सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर, य़ा करीत आहेत.

blank