34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता साखरखेर्ड्यात मोहरम मिरवणुकीवर दगडफेक;१२ जखमी

साखरखेर्ड्यात मोहरम मिरवणुकीवर दगडफेक;१२ जखमी

0
384

blank

: अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या : तगडा बंदोबस्त
बुलढाणा-पोलीस दप्तरी लाल शेऱ्यात संवेदनशील नोंद असलेल्या साखरखेर्ड्यात १८ जु्र्लेच्या सायंकाळी सातच्या सुमारास मोहरम ताजियाच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. यात माझी जि.प. उपाध्यक्ष, माजी सरपंचासह दहा ते बारा जण जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
साखरखेर्डा येथील मोहरम मिरवणूक दुपारी तीन वाजता गुजरी चौकातून निघाली. सायंकाळपर्यंत शांततेत सुरू असलेल्या मिरवणुकीला सात वाजता गालबोट लागले. माळी पुरातून जात असतानाच दगडफेक सुरू झाली. याची माहिती मिळताच गावातील दुकाने पटापट बंद झाली. घटनास्थळाच्या भागात दगडफेकीने पळापळ झाली. दगड लागून माजी सरपंच कमलाकर गवई , माजी सरपंच दाऊद सेठ कुरेशी , माजी उपसरपंच अय्युब कुरेशी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधवसह १० ते १२ जण जखमी झाले. पोलिसांनी अश्रू धुराचा वापर करून जमावाला पांगविले. यावेळी हाती लाठ्याकाठ्या घेऊन काहीतरी रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, साखरखेर्डा ठाणेदार स्वप्निल नाईक, रवी सानप यांनी गावकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी आजूबाजूच्या पोलिस ठाण्यामधील अतिरिक्त कुमक बोलावली. तसेच बुलढाण्यातून दंगा काबू पथकासह कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दगडफेक कशी झाली या संदर्भात माहिती पुढे आली नसली तरी सरपंच सुनील जगताप यांच्या माहितीनुसार, माळी पुऱ्यात काही मुले आपसात भांडत असताना एकमेकांवर दगड भिरकावले. यामुळे दगडफेक मिरवणुकीवर दगडफेक होत असल्याच्या समजुतीतून प्रकरण वाढले.

blank