
अर्जुनी मोर. -तालुक्यात सध्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे.पुरपरीस्थीती निर्माण झाली आहे.अशातच तालुक्याचे भुषण असलेले नवेगावबांध जलाशय व ईटियाडोह धरण 24 जुलै रोजी सांयकाळी सात वाजता ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे 25 जुलै रोजी ईटियाडोह धरणावर गोंदिया जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य सभापती ईंजी.यशवंत गणवीर यांचे हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी पंचायत समीती सदस्य आम्रपाली डोंगरवार,गोठणगाव सरपंच संजय ईश्वार,माजी जि.प.सदस्य रतीराम राणे,माजी पंचायत समीती सदस्य दिनदयाल डोंगरवार, ग्रा.पं.सदस्य दिपक राणे,पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता केतन गि-हपुंजे,नारनवरे प्रामुख्याने उपस्थित होते.