११ व १२ वी च्या विद्यार्थ्यांची बोगस हजेरी लावणाऱ्या शाळेंवर कारवाई करा

0
33

दिल्ली सरकार प्रमाणे महाराष्ट्रातही खाजगी कोचिंग क्लासेस वर रेगुलेशन आणा :- इंजि. राजीव ठकरेले

गोंदिया- शहरात अकरावी बारावीचे विद्यार्थी खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये सकाळी पाच वाजेपासून तर रात्रीच्या नऊ वाजेपर्यंत जवळपास 14 ते 16 तास सतत शिक्षण घेत असतात.तर या विद्यार्थ्यांची हजेरी शाळेत कशी काय लागते हा मोठा प्रश्न आहे.महाराष्ट्र सरकारच्या नियमाप्रमाणे वर्गात 80 टक्के पेक्षा अधिक हजेरी असल्यावरच परीक्षेत बसू दिल्या जातो.खाजगी कोचिंग मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती ही शिक्षण विभागाने घेत,त्यांची चौकशी करुन अशा शाळांवर कारवाई करण्यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इंजि.राजीव ठकरेले यांनी राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार,खासदार डाॅ.प्रशांत पडोळे व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.

शहरांमध्ये मोठ्या मोठ्या खाजगी कोचिंग क्लासेस आहेत कोचिंग मध्ये जागा नसूनही एका वर्गात तीस विद्यार्थ्यांची जागा असल्यावर 60 – 70 विद्यार्थ्यांना बसवल्या जातो असं असूनही पालकाकडून दीड लाखाच्यावर फीस आकारली जाते. त्याचप्रमाणे आपल्या कोचिंग क्लासेसच्या प्रसिद्धीसाठी जिकडेतिकडे मोठ मोठे होर्डिंग लावले गेलेत.हे होर्डींग बॅनर धोकादायक ठरू शकते.ज्याप्रमाणे मुंबईच्या घाटकोपर मध्ये दुर्घटना घडून आली अशी घटना आपल्या शहरात घडू नये यासाठी यांच्या होर्डिंगवरही नियंत्रण लावणे खूप गरजेचे आहे.आपल्या गोंदिया शहरात परराज्यातील विद्यार्थीही खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने आले आहेत. यांची सुरक्षितेची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. त्यासाठी खाजगी कोचिंग मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची सविस्तर माहिती शिक्षण विभागासह पोलीस विभागाकडे अनिवार्य  असल्याचे निवेदनात म्हटले आहे.निवेदन देतेवेळी गोंदिया विधानसभेचे काँग्रेसचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इंजि राजीव ठाकरेले,अनिल दहिवले,बिराजदार पटले,तुफान बघेले,रंजीत मेश्राम, पंकज चिखलोंडे, रोहित दमाहे, अश्विन उपवंशी, कार्तिक चौधरी आदी उपस्थित होते.