
गोंदिया,दि.३१-जिल्ह्यातील गोरेगाव पोलीस ठाणे अंतर्गत १ डिसेंबर २०२३ रोजी घडलेल्या एका विनयभंग व इतर प्रकरणातील अपराध क्र.६४२/2023 मधील कलम ३७६,३७६/२ भांदवी गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३० जुर्ले रोजी जामीन मंजूर केला आहे.आरोपीच्या वतीने न्यायालयात एड.वेदांत एच पांडे यांनी बाजू मांडली.एड पांडे यांनी आरोपीची बाजू मांडताना फिर्यादीच्या बहीणीशी आरोपी असलेल्या वसिलांने नकार दिल्याने खोटी तक्रार दाखल करण्यात आली होती.त्या तक्रारीची तपासणी पुर्ण झाल्याने जामीन मंजूर करण्यात यावे असे सांगितले.
सविस्तर असे की, १ डिसेबंर २३ रोजी ५० टक्के मंदबुध्दी असलेल्या फिर्यादी युवतीने चिचगाव वरुन पायी जात असताना मोटारसायकलने जात असलेल्या आरोपीला गावापर्यंत सोडून देण्याची विनंती केली होती.त्यावेळी आरोपीने निर्जनस्थळी शेतात नेत त्याच्यावर अत्याचार केल्याने तक्रारीच्या आधारे ३७६,३७६/२ भांदवी नुसार गुन्हा नोंदवत कारागृहात आरोपीची रवानगी करण्यात आली होती.