अमरावती,दि.२३::आज सकाळी अमरावती वरून धारणी कडे जाणाऱ्या चावला travells बसला अपघात होऊन बस नदीपात्रात कोसळल्यामुळे त्यातील ४ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर २५ जखमी प्रवाशांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले असून त्यापैकी ७ प्रवासी गंभीर जखमी असल्याने जिल्हा शासकीय रुग्णालय ( इर्विन) येथे हलवण्यात आले आहे.उर्वरित १८ प्रवाशांच्या इलाज अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात चालू आहे. घटनास्थळी पोलिसांकडून स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने मदत कार्य राबविण्यात येत आहे.