लाडकी बहिण योजनेअंतर्गत महीला सक्षमीकरणाचे उदिष्ट्य साध्य – विधानसभा क्षेत्राचे महिला मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

0
49

तिरोडा:- महायुती सरकारने महिलांना सक्षम बनविण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महाराष्ट्रात लागू केली असून या योजनेअंतर्गत महिलांना १५०० रुपये प्रती महिना लाभ देण्यात येत असून माहे ऑक्टोंबरपर्यंत या योजनेअंतर्गत ७५०० रुपये आतापर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा जि.प.क्षेत्रनिहाय मेळावा तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांनी आयोजीत केला असून यामध्ये लाभार्थी महिलांचा उत्सुफुर्त प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शान आले आहे. महिला मेळावा प्रामुख्याने तिरोडा तालुक्यातील ठाणेगाव, वडेगाव, सेजगाव, बेरडीपार, सुकडी,बेलाटी, बयवाडा ,परसवाडा येथे महिला मेळावा आयोजित केला. तिरोडा गोरेगाव विधासभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्ष तुमेश्वरी बघेले, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीताबाई रहांगडाले, जी.प.सदस्या रजनी कुंभरे, एड.माधुरी रहांगडाले, चत्रभूज बिसेन, प.स.सभापती कुन्ता पटले, भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, विधानसभा संयोजक पवन पटले, विधानसभा प्रमुख विजय राणे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्वाती चौधरी, प. स. कविता सोनेवाने, प्रमिला भलाई,दिपाली टेंभेकर, सुनंदा पटले, ज्योती शरणागत, प.स.उपसभापती हुपराज जमाईवार, डॉ.चेतलाल भगत, तेजराम चव्हाण, डॉ. ब्रिजलाल रहांगडाले,मा.उपसभापती डॉ.वसंत भगत, जिल्हा महामन्त्री मदन पटले, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रवींद्र वहिले, भाजप महामंत्री रवी मुटकुरे, ओबीसी महामन्त्री गौरी पारधी, सोशल मिडिया प्रमुख संजय पारधी, व संबधित गावातील ग्रा.प.चे सरपंच, व महिला भगिनी उपस्थित होते.