भंडारा शासकीय वैद्यकीय  महाविद्यालयाचे ऑनलाइन उद्घाटन

0
46

भंडारा दि. 9 : जिल्हयातील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन  आज नियोजन भवन येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते तर राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील  दूरदृष्य प्रणालीद्वारे संपन्न झाले.या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि अन्य केंद्रीय मंत्री  यांची डिजीटल  उपस्थिती होती.

या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आमदार नरेंद्र भोंडेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, माजी खासदार सुनील मेंढे, प्रभारी जिल्हाधिकारी आशा पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, अधिष्ठाता डॉ.विपुल अंबाडे, जिल्हा  शल्यचिकीत्सक डॉ.दीपचंद सोयाम यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संबोधीत केले.

वैदयकीय महाविदयालयाची  वैशीष्टय

  • 100 विदयार्थी क्षमता
  • 430 खाटांचे रुग्णालय आहे
  • मौजा पलाडी येथे – 25 एकर जागेचा सातबारा झाला आहे.
  • प्रवेश लवकरच सुरू होतील.