
भंडारा दि. 11 : मतदार जनजागृती अभियान स्वीप अंतर्गत शिक्षण विभाग पंचायत समिती भंडारा व नूतन कन्या विद्यालय भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने भंडाऱ्यातील प्रसिद्ध शितला माता मंदिर खांब तलाव भंडारा येथे आज सकाळी 9.00 वा. मतदार जनजागृती पथनाट्या चे आयोजन करण्यात आले. यामध्ये नूतन कन्या विद्यालय भंडारा येथील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला व त्यांच्या संचाने पथनाट्य सादर केला.
या पथनाट्याला भरपूर गर्दी जमलेली होती. आणि सर्वांनी या पथनाट्याच्या आनंद घेतला.उत्स्फूर्त आणि प्रसंशनीय असा पथनाट्य नूतन कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केला. मतदारांनी जागृत होऊन कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता आपल्या घटनेने दिलेला अधिकार आपण वापरून मतदान करावं
याबद्दल सुंदर असं नाटकीय पथनाट्य सादर करून नागरिकांमध्ये मतदान करण्याविषयी ऊर्जा निर्माण केली. व या येणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीमध्ये अधिका अधिक मतदान व्हावे या दृष्टीने या पथनाट्याचा वापर भविष्यात होईल अशा प्रकारे सादरीकरण या विद्यार्थ्यांनी इथे केला.
शंकर राठोड तालुका नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गिरधारी भोयर विस्तार अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व श्रीमती तिडके मॅडम प्राचार्य नूतन कन्या विद्यालय भंडारा त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी व त्यांच्या विद्यालयातील अकरावी बारावीचे विद्यार्थ्यांनी तालुका स्वीप चमू यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला.
अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण भाविक मंडळी आणि रस्त्याने जाणारे नागरिक यांनी या पथनाट्या चा आनंद घेतला.त्याचप्रमाणे या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वांनी कौतुक केले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक गिरधारी भोयर विस्तार अधिकारी यांनी केले सदर कार्यक्रमाचे संचालन महेश जगनिक मुख्याध्यापक आभार राजेश देशमुख मुख्याध्यापक यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी तालुका स्वीप चमू सोपचंद सिरसाम, दिलीप सिंगनजुडे, अशोक भुरे, संजय माने, दुर्गाप्रसाद शेंडे यांनी सहकार्य केले.