
गोंदिया,दि.२४ःओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा द्वारा संघटनेच्या जयस्तंभ चौकातील कार्यालयात संघटनेचे अध्यक्ष बबलू कटरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी महायुतीच्या प्रमुख पक्ष भारतीय जनता पार्टी द्वारे गोंदिया विधानसभेत अल्पसंख्याक विनोद अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्याने. बहुसंख्यांक समाजावर अल्पसंख्यांक प्रतिनिधित्व करण्यासाठी उमेदवार जाहीर केली याच्या जाहीर निषेध संघटना करीत आहे आणि अपेक्षा करीत आहे की ही चूक महाविकास आघाडी तर्फे होऊ नये अन्यथा संघटना त्यांच्याही जाहीर निषेध करेल आणि निवडणुकीत पुढची भूमिका ठरवेल या सभेला जिल्हा अध्यक्ष बबलू कटरे, कार्याध्यक्ष अमर वराडे, शिवसेना जिल्हाप्रमुख पंकज यादव, बीएसपीचे जिल्हाध्यक्ष सुनील भरणे, जिल्हा महासचिव व जिल्हा परिषद गोंदियाचे सभापती सोनू कुथे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पप्पू पटले, समितीचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण नागपुरे, गोंदिया विधानसभाचे प्रभारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक इंजि राजीव ठकरेले, लोहार समाज जिल्हाध्यक्ष अनिल मेश्राम, पत्रकार महेंद्र बिसेन, विजेंद्र कटरे, मुकेश भांडारकर, संतोष इंदुरकर व इतर कार्यकर्ता उपस्थित होते.