आज 9 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल : 51 अर्जाची उचल

0
193

गोंदिया,  दि.24 :  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यात 24 ऑक्टोबर रोजी 09 उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले व 51 अर्जाची उचल करण्यात आली आहे.

       आज उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार पुढीलप्रमाणे. गोंदिया विधानसभा मतदारसंघातून ओमप्रकाश रहांगडाले यांनी अपक्ष नामांकनपत्र दाखल केले व विनोद अग्रवाल यांनी भाजप पक्षातून नामांकनपत्र दाखल केले आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून ॲड. पोमेश सुखदेव रामटेके यांनी अपक्ष नामांकनपत्र दाखल केले व बन्सोड दिलीप वामन यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातून नामांकनपत्र दाखल केले आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघातून सहषराम मारोती कोरोटे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून 2 नामांकनपत्र दाखल केले. चाकाटे विलास पंढरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पक्षातून नामांकनपत्र दाखल केले. संजय हनुवंतराव पुराम यांनी भारतीय जनता पार्टी पक्षातून नामांकनपत्र दाखल केले आहे. तिरोडा विधानसभा मतदारसंघातून रविकांत खुशाल बोपचे यांनी नॅशनलीस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) पक्षातून नामांकनपत्र दाखल केले. विजय भरतलाल रहांगडाले यांनी भारतीय जनता पार्टी पक्षातून नामांकनपत्र दाखल केले आहे.

        आज 63-अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 21 अर्जाची उचल करण्यात आली. 64-तिरोडा विधानसभा क्षेत्रामध्ये 11 अर्जाची उचल करण्यात आली. 65-गोंदिया विधानसभा क्षेत्रामध्ये 03 अर्जाची उचल  करण्यात आली व 66-आमगाव विधानसभा क्षेत्रामध्ये 16 अर्जाची उचल करण्यात आली.