गळ्यातील मंगळसूत्र पळविणाऱ्यांना गुन्हे शाखेकडून अटक

0
44

आरोपी चोरट्यांकडून 2 लक्ष 50 हजार रुपयांचा मुद्यमान जप्त

कळमेश्वर : ब्राह्मणी शहरातील गजबजलेल्या शिक्षक कॉलनी परिसरातील दुर्गा मंदिरात दुर्गा मातेची ओटी भरण्यासाठी जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र होंडा एक्टिवा मोपेड दुचाकी वर पाठीमागून येऊन महिलेला छातीवर धक्का देत गळ्यातील मंगळसूत्र तोडून अज्ञात चोरटे धुम स्टाईल पसार झाल्याची घटना दिनांक 8 ऑक्टोंबर 2024 रोजी सकाळी सहा वाजता घडली घडली होती.

यातील फिर्यादी महिला ब्राह्मणी शिक्षक कॉलनी येथे राहणाऱ्या सौ कुमुद सतीश धोटे वय 47 वर्ष या गृहिणी आहेत नवरात्र उत्सव सर्वत्र साजरा होत असताना घराजवळच असलेल्या दुर्गा मंदिरात दुर्गा मातेची ओटी भरण्यासाठी घटनेच्या दिवशी गेल्या होत्या त्याचवेळी त्यांच्या मागून एक्टिवा होंडा मोपेड वर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचे जवळ थांबून दुचाकी वर मागे बसलेल्या चोरट्याने त्यांच्या छातीवर जोराने धक्का मारून त्यांच्या गळ्यामध्ये असलेले सोन्याचे दीड तोळ्याचे एक लक्ष दहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तोडून नेले घटना घडताच गोंधळल्याने त्यांनी आरडाओरड केली मात्र पहाटेची वेळ असल्याने कुणीही धावून आले नाही.

परंतु थोड्या अंतरावर असलेल्या एका महिलेने त्यांना एक्टिवा गाडीवर ही दोन मुले बराच वेळापासून फिरत असल्याचे सांगितले. दुचाकी वर आलेल्या दोन्ही चोरट्यांनी तोंडावर काळ्या रंगाचा स्कार्फ बांधलेला होता मागे बसलेल्या ज्या चोरट्याने मंगळसूत्र ओढले त्याने पांढऱ्या रंगाची टी-शर्ट घातल्याचे माहिती फिर्यादी कुमुद धोटे यांनी पोलिसांना दिली. मंगळसूत्र ओढून चोरटे अति वेगाने दुचाकी घेऊन पसार झाल्याने दुचाकी चा नंबर त्या पाहू शकल्या नव्हत्या.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत सौ कुमुद सतीश धोटे यांनी  कळमेश्वर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने अज्ञात चोरट्या विरुद्ध कळमेश्वर पोलीस स्टेशन मध्ये कलम 304(2),3(5) भा.न्या. स गुन्हा दाखल करण्यात आला होता. कळमेश्वर पोलीस निरीक्षक काळबांडे व सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी सावनेर अनिल म्हस्के यांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली व परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. या अज्ञात चोरट्यांबाबत कुणास काही माहिती मिळाल्यास त्वरीत कळमेश्वर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय अधिकारी अनिल मस्के तसेच ठाणेदार काळबांडे यांनी केले होते सहा महिन्यातील मंगळसूत्र चोरीची दुसरी घटना होती.

त्यामुळे  कळमेश्वर पोलिसांच्या कर्तव्य दक्ष पणावर प्रश्नचिन्ह लागल्याचे नागरिकांमध्ये चर्चा होती.  कळमेश्वर पोलिसांनी पेट्रोलिंग मध्ये वाढ करून चोरट्यांना शोधून काढण्याची मागणीही नागरिकांकडून करण्यात आली होती त्यामुळे कळमेश्वर पोलिसांसह नागपूर ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन अथक परिश्रम करत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले.

या कॅमेऱ्यामध्ये सदर चोरटे कैद झाले शिवाय खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या चोरट्यांना पोलिसांनी शोधून काढले त्यांच्याकडून गुन्ह्यातील आरोपी हे कपिल नगर भागातील असल्याच्या माहितीवरून आरोपी निलेश उर्फ अभी राजू कडबे वय 27वर्षे, रा. समता नगर. नागपूर हा संशयितरित्या मिळून आल्याने त्यास विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार आरोपी उस्मान अकबर खान 20 वर्ष रा.कपिल नगर नागपूर याचे सह मिळुन गुन्हा केल्याचे व गुन्ह्यातील हिसकावलेले सोन्याचे मंगळसूत्र आरोपी क्रमांक एकचा फरार असलेला साथीदार आरोपी फैजान अन्सारी रा.टिमकी, मोमीनपुरा नागपूर यास विकले बाबत माहिती उघड केल्याने व गुन्ह्यात वापरलेली ऍक्टिवा होंडा मोटरसायकल त्याचे ओळखीचे इसमास विकल्याचे माहितीवरून आरोपी उस्मान जवळून चाळीस हजार रुपये नगदी ,एक विवो मोबाईल किंमत 10,000रू , एक होंडा ड्यू मॉपेड कि.100,000 तसेच साक्षीदार याचे जवळ असलेली गुन्ह्यात वापरलेली एक्टिवा होंडा मोपेड किमत एक लक्ष रुपये असा एकूण 2 लक्ष 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना अटक करण्यात आली.

गुन्ह्याचे पुढील तपासात त्यांना पो.स्टे. कळमेश्वर येथे मुद्देमालासह हस्तातरिंत करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांनी दिली सदर कारवाई पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक धुमाळ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे,स.पो.नी.किशोर शेरकी,स.पो.नी.मनोज गदादे,स.पो.नी.जीवन राजगुरू,स.पो.नी.आशिष ठाकूर,स.पो.नी.सागर गोमासे ,पो.उप. नि. बत्तूलाल पांडे ,पो.हवा.संजय बानते,पो.हवा.इक्बाल शेख,पो.हवा.प्रमोद भोयर ,मपो हवा नीतू रामटेके,पो. ना. संजय बरोदीया पो.ना.सतीश राठोड,सायबर सेल चा.पो.हवा. राहुल पाटील,चापो.हवा. आशुतोष लांजेवार ,चालक पोलीस नायक सुमित यांनी केली.