निवडणूक खर्च निरीक्षक कपिल कपूर यांची चेकपोस्टला भेट

0
184

गोंदिया, दि.25 :  निवडणूक खर्च निरीक्षक कपिल कपूर गोंदिया जिल्ह्यात दाखल होताच त्यांनी नवेगाव खुर्द तिरोडा व गोंदिया येथील कारंजा बायपास चेकपोस्टला भेट देवुन पाहणी केली व उपस्थितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी संपर्क अधिकारी प्रशांत इंगोले, वित्त व लेखा अधिकारी जर्नादन खोटरे, लेखा अधिकारी प्रवीण वैद्य, एस.जे.चव्हाण, प्रमोद डोहाळे, जागेश्वर खोब्रागडे यांची उपस्थिती होती.

        चेकपोस्टवरील कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी यांनी सतर्क राहुन काम करावे. सर्व वाहनांची कसून तपासणी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.