गद्दारीला उत्तर द्यायला प्रहार लढणार !-डाॅ.सुगत चंद्रिकापुरे

0
219
अर्जुनी मोरगाव,दि.२९ः-अर्जुनी मोरगाव विधानसभेच्या निवडणुकीकरिता प्रहार जनशक्ती संघटनेचा उमेदवार म्हणून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आज मी उमेदवारी अर्ज मायबाप जनतेच्या आशीर्वादाने दाखल केल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार डाॅ.सुगत चंद्रिकापुरे यांनी दिली.
अर्जुनी मोरगाव येथे जमलेला जनतेचा अफाट महासागर पाहून माझे मन भरून आले आणि विजयाची खात्री वाटली. ढोल ताश्याच्या गजरात भव्यदिव्य रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत हजारोंच्या संख्येत सहभागी झालेल्या नागरिकांनी लक्ष वेधून घेतले. कोणी कितीही तिकीट कापो अथवा काहीही करो पण माझी मायबाप जनता माझ्याबरोबर आहे, यामुळे मला लढण्याची कायमच ताकद मिळालेली आहे आणि त्याच ताकदीने आज मी आमदारकीसाठी माझ्या मायबाप जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी, गद्दारीला त्यांची जागा दाखविण्यासाठी जिंकून येणार अशा आशावादही व्यक्त केला.सोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व प्रफुल पटेल यांनी आमचाच नव्हे तर भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अनेक नेत्यांचे राजकीयच नव्हे तर सामाजिक जिवनही उध्दवस्त केल्याची टिका करीत आपल्या समोर कुणी वाढत असेल तर त्यांना बघवले जात नसल्याचे सांगत आम्ही जनतेतून तयार झालेले कार्यकर्ते आहोत,अजित पवार,प्रफुल पटेलासारखे सोन्याच्या चमचा घेऊन आलोले नाहीत असेही ते म्हणाले.
यावेळी, प्रहार जनशक्ती संघटनेचे आमदार बच्चू कडू, आमदार मनोहर चंद्रिकापुरे साहेब प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष व इतर प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.