निवडणुकीपूर्वी गुलाबी जॅकेट घालून फिरणारे अर्थमंत्री अजित दादा पवार यांनी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासनपूर्ती करण्यासंबंधी बजेटमध्ये कुठलीच तरतूद करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने आठ लाख कोटीपेक्षा जास्त कर्ज घेतलेले आहे जे सर्व सामान्यांच्या डोक्यावर बोजा आहे. ते कर्ज कमी करण्यासंबंधी बजेटमध्ये उत्पन्न वाढी संदर्भात कुठेही स्पष्टीकरण नाही. महाराष्ट्र सरकारला पाठिंबा देणारे आमदार आणि सहकार्य करणारे त्यांचे दलाल लाभार्थी यांचे खिसे गरम करणारा हा बजेट दिसत आहे. महाराष्ट्र राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील युवकांचे रोजगार वाढविण्यासंबंधी यात कुठलीही तरतूद नाही अतिशय निराशा जनक असा बजेट फडणवीस सरकारने आज पेश केला.अमर वराडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी