
गोंदिया,दि.३०- शासकीय कार्यालये आणि प्रशासकीय इमारतींमध्ये स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाची समस्या गंभीर आहे. काही इमारतींमध्ये कचरा साठलेला आहे, तर काही ठिकाणी स्वच्छतागृहे आणि इतर सार्वजनिक जागा अस्वच्छ आहेत. यामुळे, या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि कामानिमित्त येणार नागरिक त्रस्त झालेआहेत. प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.प्रशासकीय इमारतीच्या पहिला,दुसरा व तिसर्या मजल्यावर असलेल्या विविध कार्यालय परिसरात घाण असून आग लागल्यास आगीवर नियंत्रणाकरीता अग्निशमन यंत्रे बसविण्यात आले आहेत.त्यांची मुदत काय याकडे मात्र कुणीही विभागप्रमुखांनी लक्ष दिलेले नाही.त्यामुळे अचानक लाग लागल्यास कुचकामी ही यंत्रे प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे जिवघेणे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शासकीय कामासाठी शासकीय इमारतीतील प्रत्येक मजल्यावर प्रसाधनगृहे आहेत.मात्र त्यांची दुर्दशा बघवत नाही.जिल्ह्यातून दररोज मोठ्या संख्येने लोक येथे येतात.आधीच सरकारी काम ते वेळेत होत नाहीच.त्यामुळे नागरिकांना येथे ताटकळत थांबावे लागते.पण त्यांच्यासाठी या सुविधा बिनकामाच्या आहेत.प्रशाधनगृहांमधील दुर्गंधी असह्य असते.
प्रशासकीय इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर बसवलेली अग्निशमन यंत्रणा सुध्दा कालबाह्य झाल्याचे दिसून आले.ही यंत्रे २०१८ मध्ये बसवली आहे.त्याची मुदत एक वर्षाची असते.आता ७ वर्षे झाली तरी त्या बदलेल्या नाहीत.