जिल्हास्तरीय बक्षिस वितरण समारंभात 221 विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह वाटप…

0
35

गोंदिया, (दि. 29): ध्येय एज्युकेशन फाऊंडेशन व ध्येय प्रकाशन अकॅडमी महाराष्ट्र द्वारा घेण्यात आलेल्या आय एम विनर व विनर ऑफ द इयर या राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेचे जिल्हास्तरीय बक्षीस वितरण नुकतेच (दि. 26) गोंदिया पंचायत समितीच्या सभागृहात पार पडले. कार्यक्रमात जिल्ह्यातील 221 गुणवंत विद्यार्थ्यांना राज्यस्तर, विभागस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व केंद्रस्तर सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

दिनांक 26 एप्रिल रोजी ख्रिश्चन धर्मगुरू यांचे देहावसान झाल्याने शासनाने शासकीय दुखवटा जाहीर केल्यामुळे बक्षीस वितरण कार्यक्रम शांततेत पार पाडला गेला. कोणतेही उद्घाटन व स्वागत समारोह करण्यात आले नाही. फक्त आलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमात देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार व कर्तव्यदक्ष अधिकारी कर्मचारी सन्मान हे पुढच्या महिन्यात देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख वशिष्ठ खोब्रागडे यांनी सांगितले आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोंदिया तालुका प्रतिनिधी मीनल टेंभरे, आमगाव तालुका प्रतिनिधी धनराज भगत, साधनव्यक्ती बी डी चौधरी, अंकला माने, ओ एस ठाकरे, सुनीलकुमार ठाकूर, खुमेशकुमार कटरे, शिक्षक मुकेशकुमार रहांगडाले, नरेंद्र गौतम, आर. सी. चौधरी, स्नेहा रामटेके, यांनी सहकार्य केले.