विद्युत खांब पडल्यामुळे एका बैलाचा मृत्यू

0
41

गोंदिया- जिल्ह्यात आज दुपारी अचानक वादळी वारा आला आणि या अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे आमगाव तालुक्यातील कट्टीपार येथे श्रावणजी मेंढे यांच्या घरावरील लोखंडी पत्र पूर्ण उडून पडले. आणि घराजवळी असलेला विद्युत खांब पडला त्यामुळे गोढ्यात असलेला एक बैल सुद्धा मरण पावला आणि पूर्णतः घरावरील पत्रे उडाल्यामुळे आता कुठे राहावे असा प्रश्न मेंढे परिवारावर उपस्थित झाला आहे. या वादळी वाऱ्यामुळे मेंढे यांचे मोठे नुकसान झाल्याची दिसून आले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता मेंढे यांनी केली आहे.