राज्य माहिती आयुक्त रविंद्र ठाकरे यांनी पदभार स्विकारला

0
96
अमरावती, दि.10: अमरावती खंडपीठ राज्य माहिती आयुक्तपदी रविंद्र हनुमंतराव ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी गुरूवार, दि 8 मे रोजी कार्यभार स्वीकारला.
यावेळी राज्य माहिती आयोग, अमरावती खंडपीठातील उप सचिव देविसिंग डाबेराव, तत्कालीन उप सचिव अॅड. डॉ. सुरेश कोवळे आणि आयोगातील इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
नवनियुक्त राज्य माहिती आयुक्तांनी सर्वप्रथम आयोगातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी ओळख करून घेतली. त्यानंतर उप सचिव श्री. डाबेराव यांच्याकडून त्यांनी कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. कार्यालयाची पाहणी करून आपल्या कामकाजाला सुरुवात केली.