गोंदिया,दि.१०ःसध्या भारत व पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या युध्द परिस्थितीला बघून आपण व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्राशी संबधित असल्याने या काळात देशाच्या सिमेवर सैनदलाच्या आरोग्य शिबिरात सेवा देण्याची आपली ईच्छा असून या काळातील स्थिती बघता आपण आपले एक महिन्याचे खासदारकीचे वेतन राष्ट्रसेवेकरीता देत असल्याचे पत्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे खासदार डाॅ.प्रशांत यादवराव पडोळे यांनी आज(दि.१०)दिले आहे.सोबतच देशातील सर्व खासदार,लोकप्रतिनिधी यांना सुध्दा भारत पाकिस्तान युध्द वातावरणाच्या स्थितीत आपले एक महिन्याचे वेतन राष्ट्रसेवेकरीता सैनबलाचे मनोबल वाढविण्याकरीता द्यावे असे खासदार डाॅ.प्रशांत पडोळे यांनी म्हटले आहे.