बाई गंगाबाई ब्लड बँकेत त्वरित ब्लड कंपोनंट युनिट सुरू करा

0
29

– अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल”

गोंदिया, दिनांक १२–गोंदिया मेडिकल कॉलेजच्या बाई गंगाबाई ब्लड बँकेत अद्याप ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट कार्यान्वित करण्यात आलेली नाही. या महत्त्वाच्या सुविधेच्या अभावामुळे थॅलेसीमिया आणि सिकलसेल अशा गंभीर आजारांनी ग्रस्त निरागस मुलांना वेळेवर प्लाझ्मा, पीआरसी, प्लेटलेट्स अशा आवश्यक रक्तघटकांचा पुरवठा होऊ शकत नाही.

या जनहिताच्या विषयासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील असलेले रक्तमित्र  विनोद चांदवानी ‘गुड्डू’ यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर बाई गंगाबाई ब्लड बँकेत ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट सुरू झाले नाही, तर थॅलेसीमिया ग्रस्त बालकांचे पालक आणि विविध सामाजिक संस्था यांच्यासह मिळून गोंदिया मेडिकल कॉलेजच्या डीन कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.

पडोसी भंडारा जिल्ह्यात, जिथे रुग्णसंख्या तुलनेने कमी आहे, तिथे ही सुविधा आधीपासूनच उपलब्ध आहे. मात्र गोंदियात, जिथे आरोग्यसेवा आणि रुग्णालयांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि मध्यप्रदेश व छत्तीसगड या सीमाभागांतूनही मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येतात, अशा ठिकाणी ही युनिट अद्याप सुरू न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

मध्यमवर्गीय रुग्णांना ब्लड कंपोनंटची गरज भासल्यास त्यांना खासगी ब्लड बँकांमधून महागात रक्तघटक खरेदी करावे लागतात, त्यामुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक ओझे वाढते आहे.

प्रशासनाकडे जनहितार्थ मागणी करण्यात येते की, बाई गंगाबाई ब्लड बँकेत तातडीने ब्लड कंपोनंट सेपरेशन युनिट सुरू करण्यात यावे, अन्यथा उग्र जनआंदोलन करण्यात येईल, आणि त्याची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनावर राहील.