नवेगावबांधच्या चाणाक्षी बडोले हिची दहावीच्या परीक्षेत उतुंग भरारी

0
45

नवेगावबांध दि.16.- येथील प्रभाग क्रमांक ६ मधील रहिवासी ग्रामपंचायत अधिकारी नरेश बडोले यांची मुलगी चाणाक्षी हिने काल जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत एकूण ५०० पैकी ४८७ गुण व ९७.४० टक्के गुण घेत अर्जुनीमोरगाव तालुक्यातू द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
तिने घेतलेल्या उत्तुंग भरारीमुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.चाणाक्षी अर्जुनीमोरगाव येथील जीएमबी हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.चाणाक्षी निकालाच्या दिवशी नागपूरला होती,आपली नेमकी टक्केवारी काय राहणार? याबाबतची धाकधूक तिच्या मनात होती.तिच्या मैत्रिणीकडून तिला निकाल पहिल्यांदा कळला.
निकाल व टक्केवारी ऐकताच आनंदाचा सुखद धक्का चाणाक्षीला बसला.तिचा आनंद गगनात मावेनासा झाला.ही अपार आनंदाची बातमी तिने आपल्या पप्पांना व मम्मीला दिली.वर्षभर केलेल्या मेहनतीचे फळ चाणाक्षीला मिळाल्याचा आनंद वडील नरेश,आई वर्षा,भाऊ मेहुल व आजी भूमिका बडोले यांना झाला.

ला डॉक्टर व्हायचंय आहे-चाणाक्षी बडोले.
आई गृहिणी असून मला भविष्यात डॉक्टर व्हायचं आहे.यासाठी मी आतापासूनच कामाला लागलीआहे. सध्या मी नीटची तयारी करीत आहे.माझे ध्येय प्राप्त करण्यासाठी व आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम मी घेत आहे. पुढचा अभ्यास आता सतत सुरू ठेवणार आहे.माझ्या यशात माझे शिक्षक व मला नेहमी प्रोत्साहन देणारे माझे आई-वडील यांचा सिंहाचा वाटा आहे.विद्यालयात वर्षभर घेण्यात आलेल्या सराव परीक्षांची आणि प्राचार्य व शिक्षकांची मोठी मदत झाली.शिवाय आई-वडीलांचे सुध्दा मोलावे मार्गदर्शन मिळाले. तसेच स्थानिक स्तरावर प्रशांत कापगते व विक्रांत मोहबंशी यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मला हे यश संपादन करता आले आहे.आपल्या ध्येयावर केंद्रित केलेले लक्ष,सोबतीला जिद्द आणि चिकाटी हेच आपल्या ध्येयाकडे नेत असते,असे चाणाक्षी बडोले हिने सांगितले. चाणाक्षीचे यशा बद्दल गावात व तालुक्यात अभिनंदनचा वर्षाव होत आहे.