आमचे रक्त घ्या,पण कर्जमाफी द्या-प्रहार पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन

0
34

चित्रा कापसे
तिरोडा-प्रहार जनशक्ती पक्षातर्फे राज्य व्यापी आंदोलन उभारले असून त्यामध्ये शेतकरी, शेतमजूर,दिव्यांग, वंचित घटकांसाठी तसेच समाजातील अनेक लोकांसाठी त्यांचा जिवनमान उंचावा यासाठी माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे ताळ मृदंगाच्या तालात भजनं गायन करून खालीलप्रमाणे विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी,दिव्यांगाना ६ हजार रुपये महिना मानधन, शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे मनरेगा अंतर्गत करण्यात यावी, शेतकऱ्यांचा शेत मालाला हमी भाव मिळालाच पाहिजे, घरकुलाचे अर्थसहाय्य करताना शहर व ग्रामीण असा भेदभाव न करता समान निधी मंजूर करण्यात यावा यासह ईतर लोकोपयोगी मागण्यासाठी प्रहारचे नेते माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार मागील चार महिन्यांपासून सरकार विरोधात राज्य भर रान पेटविले असून विविध अभिनव आंदोलनातून प्रहार सतत सरकारला निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देत आहे.
रायगड जिल्ह्यातील पाचाड येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या समाधी स्थळा पासून व स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल जाणाऱ्या रायगड किल्याचे पायथ्याशी ४ दिवस बेमुदत उपोषण , नंतर राज्यातील सर्वच मंत्री, राज्यमंत्री यांच्या घरासमोर रात्री १२ वाजता मशाल मोर्चा प्रहार च्या वतीने राज्यभर करण्यात आला.
तर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने बच्चू कडू यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यभर मंत्र्यांचा घरासमोर रक्तदान आंदोलन करण्यात आली.यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील खाजगी निवासस्थान असलेल्या धरमपेठ भागात रक्तदान आंदोलन करण्यात आले.
यावेळी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भजन म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारला या मागण्याची दखल घेण्यात यावी अशी मागणीही केली.तर आमचे रक्त घ्या पण कर्ज माफी दया अशी मागणी करत अनेक आंदोलकांनी रक्तदान करत आंदोलनात सहभाग घेतला .
ह्या आंदोलनाचा तिसरा टप्पा असून पुढील आंदोलन २ जून ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गावी बारामती येथे जाहीर सभा घेवून विविध मंत्र्यांच्या गावी जाहीर सभा घेत समारोप ६ जून ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर होईल.
यावेळी बल्लू भाऊ जवंजाळ कार्याध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष महाराष्ट्र, मंगेश भाऊ देशमुख चांदुर बाजार शेतकरी अध्यक्ष प्रहार संघटना, संजय भाऊ देशमुख प्रहार विदर्भ प्रमुख, रमेश भाऊ कारेमोरे जिल्हाप्रमुख नागपूर, महेंद्र भाऊ भांडारकर जिल्हाध्यक्ष गोंदिया, अंकुश भाऊ वंजारी भंडारा जिल्हाप्रमुख, शेरखान पठाण जिल्हाप्रमुख चंद्रपूर, निखिल धार्मिक जिल्हाप्रमुख गडचिरोली, सतीश बिडकर चंद्रपूर जिल्हाप्रमुख, अमोल इसपांडे नागपूर शहर प्रमुख, वनिताताई भांडारकर पंचायत समिती सदस्या, उमेश भाऊ महाजन माजी नगरसेवक रामटेक नगरपरिषद, राहुल बावणे तालुकाप्रमुख मौदा, अक्षय तलमले तालुकाप्रमुख, प्रदीप निशाने तालुकाप्रमुख तिरोडा, विकास धनरे आरमोरी विधानसभा अध्यक्ष, विवेक ठाकरे आरमोरी तालुका प्रमुख, रोहन चक्कनवार युवा जिल्हाध्यक्ष, अक्षय बोंधीलवार युवा वरोरा तालुका प्रमुख, विनोद शिंदे कोरपना राजूरा विधानसभा प्रमुख, प्रकाश नाकतोडे लाखांदूर तालुका प्रमुख, रवींद्र गभने तुमसर तालुकाप्रमुख, चिंतामण तिबुडे मोहाडी तालुका प्रमुख, जयंतराव देशपांडे लाखनी तालुकाप्रमुख,पश्चिम नागपूर अध्यक्ष कविश्वर राऊत, कार्याध्यक्ष प्रवीण हातमोडे , फुटाळा वार्ड अध्यक्ष राजेश कातरे , उत्तर नागपूर अध्यक्ष श्याम रहांगडाले यांच्या सह अनेक कार्यकर्ते व शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.