नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ऑगस्ट महिन्यात सुरू होणार

0
9
नवी मुंबई : बहुप्रतिक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आता ऑगस्ट २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे. उद्घाटनाच्या तारखेची अधिकृत घोषणा पावसाळी अधिवेशन काळात होण्याची शक्यता आहे.

आधीच्या नियोजनानुसार विमानतळाचे उद्घाटन १५ मे २०२५ पर्यंत होणार होते. पण विमानांच्या सुरक्षित वाहतुकीत काही अडथळे अद्याप आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्यामुळे विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने नोटीस टू एअरमन अर्थात नोटॅम जारी करुन किमान ६ ऑगस्ट २०२५ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टेक-ऑफ, लँडिंग, आपत्कालीन वापरासाठी अनुपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे.

विमानांच्या सुरक्षित वाहतुकीत ८६ निवासी इमारती, जवळच्या टेकड्यांवरील ७९ उंच बांधकामं, विजेच्या उच्च दाबाच्या तारांसाठी उभारलेले २३ खांब, १२ मोबाईल टॉवर, स्टेडियमचे आठ फ्लड लाईट, चार विजेचे खांब, तीन ओद्योगिक धुरांडी, औद्योगिक कामांसाठी उंचावर कार्यरत असलेल्या तीन क्रेन यांचा अडथळा आहे. हे अडथळे दूर करण्यासाठी आणखी कालावधी लागणार असल्यामुळे विमानतळाचे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ३० जूनपासून

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात सोमवार ३० जून २०२५ पासून होणार आहे. याआधी ३ मार्च २०२५ ते २७ मार्च २०२५ दरम्यान सुटीचे दिवस वगळून सोळा दिवस विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले. या अधिवेशनात १० मार्च २०२५ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. हा अर्थसंकल्प दोन्ही सभागृहांनी मंजूर केला. लक्षवेधी सूचनांची विक्रमी संख्या हे मार्च २०२५ मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होते. या अधिवेशनानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे दिमाखात उद्घाटन होण्याची शक्यता आहे.