
8 वे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन संपन्न
तिरोडा- 8 वे अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्यसंमेलन, पिंपळे गुरव येथे नक्षत्राचं देणं काव्य मंच ,मुख्यालय पिंपरी चिंचवड ,पुणे तर्फे निळू फुले नाट्यगृहा मधे दि,17 व18 मे 2025 ला आयोजित करण्यात आले.संमेलनअध्यक्ष पदी गजलकार बोल्ड कवी, द.भा. चव्हाण होते. तर संमेलनाचे आयोजन काव्यमंचचे राष्ट्रीय अध्यक्ष वादळकार,कवी राजेन्द्र सोनवणे यांनी प्रास्ताविक केले.या प्रसंगी स्वागताध्यक्ष कवी शांताराम कारंडे, बंडोपंत बोडेकर, जेष्ठ कवियत्री अल्का नाईक, जेष्ठ कवी श्रीकांत चौगुले प्रामुख्याने उपस्थित होते संमेलनाच्या सोहळ्या मधे “ मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आता पुढे काय ? “ याविषयावरील परिसंवाद मधे सहभाग घेत तिरोडा येथील कवी प्रा नरेन्द्र पोतदार यांनी अभिजात दर्जामुळे मराठी भाषा पुरातन आहे, हे सिध्द होत असले तरी साहित्यिकांना मराठी भाषेची व्यापकता वाढविण्याचा प्रयत्न करावा लागेल असे मत प्रतिपादन करीत परिसंवाद गाजविला.
द्विदिवसीय संमेलना मधे प्रगट मुलाखात, काव्यसंग्रह प्रकाशन, स्मरणिकेचे प्रकाशन तसेच आठ सत्रामध्ये काव्यमैफली संपन्न झाल्या. याप्रसंगी कवी नरेन्द्र पोतदार यांचा गुलाब पुष्प ,शाल ,प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह प्रदान करून गौरव करण्यात आला. महाकाव्यसंमेलनामधे महाराष्ट्रातील कवींची बहुसंख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ श्वेता राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ अल्का नाईक यांनी केले.