तिरोडा येथे तिरंगा रॅलीत उसलळा जनसागर

0
27

तिरोडा,दि.२३ः तिरोडा शहरात काल भारतीय सैन्याद्वारे गाजविलेल्या शौर्याचे गुणगौरव व पराक्रमाचे बखान जनसमुदायापर्यंत पोहचवण्यासाठी आपरेशन सिंदुर ची कामगिरी दाखविण्यासाठी रॅलीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सेनेच्या या अभुतपुर्व नंपराक्रमाबद्दल शहरात सेनेचे अभीवादन सम्मान आणि आभार व्यक्त करण्याकरीता शहरात श्रीराम मंदीर तिरोडा येथुन तिरंगा यात्रेचे आयोजन अंतर्राष्ट्रीय हिंदु परीषद,राष्ट्रीय बजरंग दल,सकल हिंदु समाज व समस्त तिरोडा नगरवासीयांकडुन करण्यात आले.यात्रेत एनसीसी विद्यार्थ्यानी,व माजी सैनीक दलाने भव्य 100मीटर चा तिरंगा सन्मानाने फडकवीत यात्रेची शुरुवात केली,यात्रेसमोर डिजे वर देशभक्ती गीत वाजवीत,शेकडो नागरीकांनी यात भाग घेतला.तिरोडा गोरेगांव विधानसभेचे आमदार विजयऊ राहांगडाले यांच्या प्रमुख ऊपस्तीथीमध्ये ,भारत माता की जय,जय हिंद,वंदे मातरम,अश्या जयघोषाने यात्रेची सुरुवात झाली.ही यात्रा शहरातील मेन रोड,रानी अवंतीबाई चौक,खैरलांजी रोड,प्रेम बंधन लाॅन ,पोलीस स्टेशनच्या पुढील भागाच्या मार्गाने होत,मोहनलाल चौक व गुरुदेव चौक जुनी वस्ती मार्गे महान शुरवीर महाराणा प्रताप यांच्या प्रतीमेसमोर समारोप करण्यात आला.यात्रेत गणमान्य नागरीकांत,डाॅ अविनाश जायस्वाल, राजेश गुनेरीया,उमाभाऊ हारोडे,अंतर्राष्ट्रीय हिंदु परीषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष पं रितेश तिवारी,अशोक असाटी,संजयसिंह बैस,अनुप बोपचे,डा.हितेष मंत्री,सोहानंद पारधी,प्रकाश सोनकावळे,सुशील असाटी,शितल तिवडे,नितिन पराते,धरमेन्द्र बोपचे,पिंटु भगत,चेतन परमार,वसीम शेख,रुपेश भगत राजकुमार टेंभरे,रमन सिंघल,माधुरीताई राहांगडाले,सौ सोनाली देशपांडे ,सौ संध्या लांजेवार,श्रीमती सोनकावळे,व आणखी नागरीकांची उपस्थीती होती.