खासदार प्रफुल्ल पटेलांनी घेतली येरोला कुटुंबीयांची सांत्वन भेट

0
55

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल हे सध्या विदर्भ दौऱ्यावर असून, नागपूर येथील पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्यानंतर ते गोंदिया येथे आले. या दौऱ्यात त्यांनी गोरेगाव येथील येरोला कुटुंबीयांना सांत्वन भेट दिली.
काँग्रेस कमिटीचे गोरेगाव तालुकाध्यक्ष जगदीश येरोला व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मलेश्याम येरोला यांच्या मातोश्री नरसम्माबाई येरोला यांचे 9 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जैन रिसॉर्ट कॉलनीतील निवासस्थानी 23 मे रोजी चौदावी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून येरोला कुटुंबीयांचे सांत्वन केले. यामध्ये खा. प्रशांत पडोळे, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार दिलीप बनसोड, माजी नगरसेवक सुरेंद्र पटले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. रात्री 9 वाजताच्या सुमारास खा. प्रफुल्ल पटेल यांनीही कार्यक्रमस्थळी भेट देत येरोला कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. त्यांच्या समवेत माजी आमदार राजेंद्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, नानू मुदलियार, सुरेंद्र रहांगडाले आदी राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.