खा. प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

0
115

गोंदिया -येथील निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचारधारेवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुपट्टा वापरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यात सडक अर्जुनी तालुक्यातील श्रीमती शुभांगी ताई वाढवे. सौ रोशनी सारंगपुरे. स्वीटी यावलकर. सौ संध्या श्रीरंगे तसेच गोंदिया शहरातील शहारूख भाई पठाण, पाशा भाई शेख, अनिल कुमार मेश्राम, मोहसीन अहमद, इर्शाद शेख, यांनी पक्षात आज प्रवेश केला. नवीन कार्यकर्त्यांमुळे पक्षाची विचारधारा अधिक बळकटपणे तळागाळात पोहोचविण्यात नक्कीच मदत होईल. सर्वांना भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा. यावेळी माजी आमदार श्री राजेंद्र जैन, शहर अध्यक्ष नानू मुदलियार, सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष अविनाश काशीवार, तालुकाध्यक्षा रजनीताई गिरीपुंजे सह पदाधिकारी उपस्थित होते.