41.6 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home महाराष्ट्र बुडणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीसह एकाचा मृत्यू

बुडणाऱ्या पत्नीला वाचवण्यासाठी गेलेल्या पतीसह एकाचा मृत्यू

0
102

blank

राहाता,दि.०२ः  तालुक्यातील अस्तगाव मधील चोळकेवाडी येथे शेततळ्यावर मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या पत्नीचा शेततळ्यात पाय घसरला.त्यामुळे पाण्यात पडलेल्या पत्नीला वाचविण्यासाठी पतीने उडी घेतली.हे दोघे बूडत असल्याचे बघुन एका तरुणाने त्यांना वाचविण्यासाठी शेततळ्यात उडी घेतली. या घटनेत त्या महिलेला वाचविण्यात यश आले.मात्र पती व तो तरुण शेततळ्यात बूडून मृत्यू पावले आहे.या दुर्घटनेत रामदास सखाहरी चोळके (वय 56) व आदेश आण्णासाहेब नळे (वय 22) या दोघांचा दूर्दैवी मृत्यु झाला आहे.

याबाबत माहिती अशी की,रविवारी सकाळी ०७ वाजता रामदास सखाहारी चोळके व त्यांच्या पत्नी सुमनाबाई चोळके हे दोघे त्यांच्या मालकीच्या शेततळ्यावर मोटार सुरु करण्यासाठी जात असतांना पुढे काही अंतरावर चालत असलेल्या सुमनबाई यांचा पाय शेततळ्याच्या प्लॅस्टिक कागदावरुन घसरला. त्या पाण्यात पडल्या बुडू लागल्या. हे दृष्य पाहुन त्यांचे पती रामदास सखाहरी चोळके यांनी क्षणाचाही विलंब न करता शेततळ्यात उडी घेतली. त्यानंतर वस्तीवरील तरुण आदेश आण्णासाहेब नळे याने शेततळ्याच्या दिशेने धाव घेत शेततळ्यातील पती-पत्नी बुडत असल्याचे पाहून शेततळ्यात उडी मारली. आदेशने सुमनबाईंना ढकलत शेततळ्याच्या कडेला आणले.परंतु नंतर रामदास चोळके आणि आदेश नळे हे पोहता-पोहता थकल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

blank