33.9 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home महाराष्ट्र महाराष्ट्र सरकार हाय हाय,निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या कोर्टाबाहेर घोषणा

महाराष्ट्र सरकार हाय हाय,निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या कोर्टाबाहेर घोषणा

0
175

blank

निलंबित उपनिरीक्षक रणजित कासलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी

दरम्यान रणजित कासलेने नुकतेच सोशल मीडियावर सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांच्यासह अन्य काही राजकीय नेत्यावर टिप्पणीदेखील केली होती.

मुंबई:-:-बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चर्चेत असणारे निलंबित उपनिरीक्षक रणजित कासलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी रणजित कासलेला दिल्लीतून पोलिसांनी अटक केली होती.यानंतर त्याला आज मुंबईतील किल्ला कोर्टात हजर केलं असता, कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी रणजित कासलेला कोर्टाबाहेर आणले असता त्याने ‘महाराष्ट्र सरकार हाय हाय’, ‘इन्कलाब जिंदाबाद’, अशा घोष दिल्या.

दरम्यान, गेल्या महिन्यात भांडुप येथील एका कार्यकर्त्याने रणजित कासले विरोधात तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी कासलेविरोधात गुन्हा नोंद केला होता. तसेच कासलेने नुकतेच सोशल मीडियावर दिपक केसरकर यांच्यासह अन्य काही राजकीय नेत्यावर टिप्पणीदेखील केली होती. जातीय द्वेष पसरवणे, अधिकाऱ्याची बदनामी करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर शेअर करण्याच्या आरोपाखाली रणजित कासलेला दिल्ली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.

blank