शेतकऱ्यांनो फार्मर आयडी काढा व अनुदानावर बियाणे ‍वितरणाचा लाभ घ्या

0
19

गोंदिया, दि.18 : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अंतर्गत अनुदानावर धानाचे बियाणे वितरण सुरु आहे. यामध्ये पी.डी.के.व्ही.तिलक, एम.टी.यु.1153, साधना, को-51, साकोली-9 या वाणांचा समावेश आहे. सदर वितरण हे गोंदिया तालुक्यातील जय भारत कृषि केंद्र गोंदिया, व्ही.सी.एम.एफ.गोंदिया द्वारा- दमाहे के.के.इर्री, सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था कटंगी, सेंट्रल कृषक सेवा सहकारी संस्था दासगाव या महाबीजच्या अधिकृत केंद्रावरुन वितरण सुरु आहे. यासाठी आवश्यक दस्ताऐवज- जमिनीचा 7/12, आधारकार्ड, फार्मर आयडी किंवा ॲग्रीस्टॅकवर रजिस्ट्रेशन केल्याची पावती, विहित नमुन्यातील अर्ज.

        यामध्ये शेतकऱ्यांकडे फार्मर आायडी असणे अनिवार्य आहे. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही, परंतु त्यांना अनुदानावर बियाणे उचल करायचे आहेत अशा शेतकऱ्यांनी सी.एस.सी.सेंटरवर जावून फार्मर आयडी तयार करुन घ्यावी. फार्मर आयडी तयार करण्याकरीता आवश्यक दस्ताऐवज- आधारकार्ड, जमिनीचा 7/12, गाव नमुना 8 अ, मोबाईल.

       वरील दस्ताऐवज घेऊन शेतकऱ्यांनी सी.एस.सी. सेंटरवर जावे. फार्मर आयडी तयार करण्याकरीता फक्त 5 ते 10 मिनिटांचा वेळ लागतो. परंतु फार्मर आयडी तयार झाल्यावर शेतकरी बांधवांना शेतकरी हिताच्या अनेक योजनांचा लाभ घेणे सोईचे ठरते. तरी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी त्यांचे फार्मर आयडी तयार करुन घ्यावेत व अनुदानावर बियाणे यासोबतच शेतकरी हिताच्या अनेक योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी गोंदिया पवन मेश्राम यांनी केले आहे.