राज्यातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा शिक्षक राजेश कोगदे यांचा उपक्रम

0
17
बुलढाणा,दि.२५ः-वर्गातील बरेचसे विद्यार्थी दिलेला गृहपाठ पूर्ण करत नाहीत.गृहपाठ हा वर्गात शिकविलेल्या घटकाचा सराव असतो.विद्यार्थ्यांनी दिलेला गृहपाठ वेळेत पूर्ण केला तर दिलेल्या अभ्यासाचा पूर्ण सराव होतो.आपल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने दिलेला गृहपाठ पूर्ण करावाच असे प्रत्येक शिक्षकाला वाटते; परंतु वर्गातील काही मुले गृहपाठ करण्याचा कंटाळा करतात यावर शिक्षा हा काही आजच्या काळाला अनुरूप उपाय नाही; पण यावर अफलातून उपाय शोधून काढला तो जि.प.म.उच्च प्राथमिक शाळा कदमापूर ता.खामगाव जि.बुलढाणा येथील शिक्षक राजेश वासुदेव कोगदे यांनी.जे विद्यार्थी दिलेला गृहपाठ पूर्ण करत नाहीत,त्यांना समोर बोलविल्या जाते. आणि विद्यार्थ्यांच्या हातात छडी देऊन शिक्षक कोगदे स्वतःचे हात पूढे करतात व गृहपाठ न करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या सरांच्या हातावर छडी मारायला लावतात.एकही विद्यार्थी आपल्या सरांच्या हातावर छडी मारत नाही.आणि माझे चुकले उद्या मी दिलेला गृहपाठ पूर्ण करीन असे विद्यार्थी आश्वासन देतात.दुसऱ्या दिवशी दिलेला गृहपाठ पूर्ण करतात.आता माझ्या वर्गातील सर्व विद्यार्थी गृहपाठ पूर्ण करुनच शाळेत येतात.याचा मला खूप आनंद आहे.मी केलेली कृती अतिशय छोटी आहे ; परंतु यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार, नियमितता याची रुजवण करता आली याचा अभिमान आहे.खरोखरच हा उपक्रम राज्यातील शिक्षण क्षेत्राला दिशा देणारा ठरेल असे म्हणणे उचित वाटते.