राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभा युवा कार्यकारिणी जनसंवाद सचिवपदी भागचंद्र रहांगडाले यांची नियुक्ती

0
69

गोंदिया:_ राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या युवा कार्यकारिणीच्या जनसंवाद सचिवपदी भागचंद्र रहांगडाले यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती 22 जून 2025 रोजी गोंदिया येथे पोवार बोर्डिंग येथे आयोजित राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या अधिवेशनात करण्यात आली.
गोरेगाव तालुक्यातील सटवा येथील भागचंद्र रहांगडाले हे रहिवासी असून महाविद्यालयीन जीवनापासून समाजकार्यात अग्रेसर भूमिका घेत आहेत. तालुका व जिल्ह्यातील अनेक गावांत राजाभोज जयंती कार्यक्रम तसेच समाज संघटनेच्या कामात त्यांचे नेहमीच योगदान राहिलेले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या वतीने त्यांना युवक कार्यकारिणीच्या जनसंवाद सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेचे माजी महासचिव प्रा. एच. एच. पारधी, राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेचे माजी संघटनसचिव खेमेंद्र कटरे, पवार प्रगतिशील मंच चे माजी अध्यक्ष ॲड. पी.सी.चव्हाण, प्रगतिशील शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शिशिर कटरे, राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेचे संघटन सचिव राजकुमार (पप्पू) पटले, पवार प्रगतिशील मंच गोंदियाचे माजी संचालक महेंद्र बिसेन, पवार प्रगतिशील मंच चे पदाधिकारी यांना दिले आहे.