
गोंदिया,दि.२७ः-गोंदिया पोलीस द्वारा पोलीस कल्याण निधीतून चालविण्यात येत असलेल्या 10 मीटर शुटींग रेंजचे 05 खेळाडूनी महाराष्ट्र रायफल असोशियसन द्वारा आयोजीत कॅप्टन इझीकल राज्य स्तरिय स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याने विविध ६ प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील प्री करीता निवड केली गेली आहे.मुंबई येथे ५ ते ९ जुन या दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. सदर स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत गोंदिया जिल्ह्यातील पोलीस पाल्य सुजल आदित्य अग्रवाल यांने दोन प्रकारात 50 मीटर प्रोन व 50 मीटर थ्री पोजिशन मध्ये उत्कृष्ठ प्रदर्शन केले.तसेच भूषण नैलेश शेंडे यांने 10 मीटर रायफल,मोहीत रामप्रसाद माने यांने 10 मीटर पिस्टल,जुनैरा जावेद सुभेदार 10 मीटर पिस्टल,व ओजल मनोज चुटे हिने-10 मीटर पिस्टल प्रकारात उत्कृष्ठ असे प्रदर्शन करुन प्री नेशनल स्पर्धेकरिता पात्र ठरले आहेत.उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूना पोलीस हवालदार- नैलेश शेंडे (NIS-NS) हे पोलीस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे प्रशीक्षण देत आहेत.या गौरवपूर्ण कामगीरी करीता जिल्हाधिकारी प्रजीत नायर व गोंदिया जिल्हा पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा दिल्या.