37.9 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home मराठवाडा/खान्देश लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी निक्षय मित्र उपक्रमाला गती

लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करण्यासाठी निक्षय मित्र उपक्रमाला गती

0
23

blank

**लोकसहभागातून पोषण किट वितरण करण्याचे आवाहन
लातूर, दि. 8 : जिल्ह्याला क्षयरोगमुक्त करण्याच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर यांच्या अध्यक्षतेखाली क्षयरोग विषयक जिल्हा टास्क फोर्स कमिटीची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील क्षयरुग्णांना पोषण आहार किट उपलब्ध करून देण्यासाठी समाजातील विविध घटक, उद्योजक यांनी सहभागाचे आवाहन करण्यात आले.
सध्या जिल्ह्यात 1 हजार 792 क्षयरुग्ण उपचार घेत असून, त्यापैकी 435 रुग्णांना पोषण आहार किट पुरवण्यात आले आहेत. उर्वरित 1 हजार 357 रुग्णांना पोषण किट उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र उपक्रमांतर्गत सामाजिक सहभागावर भर देण्यात येत आहे. या किटमध्ये दरमहा 3 किलो तांदूळ, गहू, ज्वारी, 1.5 किलो डाळ, 250 ग्रॅम खाद्यतेल, 1 किलो दूध पावडर, 6 लिटर दूध आणि 1 किलो शेंगदाणे यांचा समावेश आहे.
या आहारामुळे क्षयरुग्णांच्या उपचारांना पोषणाच्या माध्यमातून बळ मिळेल, असे श्रीमती करमरकर यांनी सांगितले. सीएसआर अंतर्गत काम करणाऱ्या संस्था, उद्योजक आणि औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलारयांच्यासह सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. लातूर

blank