32.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home रोजगार/व्यापार जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त युवकांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

0
45

 गोंदिया, दि.14 : जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिह्यातील युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया व शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दि.15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय अर्जुनी मोरगाव येथे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन तसेच पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

          रोजगार मेळावा तसेच व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन या कार्यक्रमामध्ये विविध कंपन्यांचे उद्योजक/नियोक्ता/प्लेसमेंट एजन्सी सहभागी होणार आहेत. करिता इच्छुक उमेदवारांनी सदर कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे.

इयत्ता 10 वी व 12 वी पास, आयटीआय, तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची तसेच व्यवसाय मार्गदर्शनाची सुवर्ण संधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया या कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहिती साठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदिया येथील दुरध्वनी क्रमांक 07182-299150 यावर किंवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधावा. या रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रा.ना.माटे यांनी केले आहे.

blank