33.7 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home गुन्हेवार्ता अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचारी ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचारी ठार

0
116

blank

भंडारा -जवळील बायपास महामार्गावर आजिमाबाद गावाजवळ दि.१२ जुलै रोजी रात्री ८.३० वाजता दरम्यान एका अज्ञात वाहनाने मोटारसायकलस्वारास चिरडले. त्यात विलास आसाराम चचाने (४०) रा.सिव्हील वार्ड, साकोली यांचा जागीच मृत्यू झाला.मृतक हे उपविभागीय कार्यालय साकोली येथे कार्यरत असल्याची माहिती पुढे येत आहे.साकोली येथील विलास चचाने हे मोटारसायकल क्र.एम.एच.३६/ए.एम.४६७७ या गाडीने गोपेवाडा येथे गेले होते. रात्री ८.३० वाजता दरम्यान ते मोटारसायकलने स्वगावाकडे नवीन बायपास महामार्गाने जात असताना आजिमाबाद गावाजवळ एका अज्ञात वाहनाने चिरडले. त्यात दुचाकीस्वार विलास चचाने यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कारधा पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यांच्या मृत्यूपश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. घटनेचा पुढील तपास कारधाचे ठाणेदार गोकूल सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पो.हवा. कांचन टेंभूर्णे करीत आहेत.

blank