35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home रोजगार/व्यापार एस. एस. जायस्वाल महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात

एस. एस. जायस्वाल महाविद्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा उत्साहात

0
52

blank

अर्जुनी मोरगाव,दि.१७ः स्थानिय शिवप्रसाद सदानंद जायस्वाल महाविद्यालय, अर्जुनी/मोरगाव आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, गोंदियाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्ताने एस. एस. जे. महाविद्यालय, अर्जुनी/मोर येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 15 जुर्लेला घेण्यात आला.
श्री दुर्गा शिक्षण संस्था, अर्जुनी/मोरगावचे अध्यक्ष लुनकरण चितलांगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या उद्घाटकीय कार्यक्रमाला रा.ना.माटे,सहा.आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गोंदिया,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ईश्वर मोहुर्ले, करिअर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ.डी.एल.चौधरी, कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन अधिकारी प्रवीण आत्राम,आय.बी.एफ.सी.गोंदियाचे समन्वयक दीपेंद्र टेंभरे,मॉडेल करिअर सेंटर गोंदियाचे समन्वयक अभिषेक सिंघवी, तसेच आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ.के.जे.सीबी प्रामुख्याने उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्याला एकूण 768 पदांसाठी 257 उमेदवारांनी आपले नाव नोंदविले. तसेच संसूर सृष्टी एंटरप्राइजेस, गोंदिया; पटले ग्रुप, नागपूर; टाटा स्ट्रीव एक्सटेन्शन सेंटर, नागपूर; एफिमन सर्व्हिसेस प्रा. लि.,नागपूर; सेफ इंटेलिजंट सेक्युरिटी सर्विसेस, दुर्ग /भिलाई; एस. बी. आय. लाइफ इन्शुरन्स, गोंदिया; उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, गोंदिया आणि आय. एस. पी. एल., नागपूर या रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीचे एच. आर. एम. उपस्थित होते. प्रारंभिक निवड चाचणी मध्ये 257 उमेदवार मधुन 107 उमेदवारांची प्राथमिक चाचणी मध्ये निवड करण्यात आली.
या उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन डॉ. आशिष कावळे, प्रास्ताविक समिती समन्वयक डॉ. डी. एल. चौधरी यांनी केले. तसेच ग्रंथपाल प्रा. अजय राऊत यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहुर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करिअर कौन्सिलिंग अँड प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. चौधरी, समिती सदस्य प्रा. अजय राऊत, प्रा. लक्ष्मीकांत कापगते, प्रा. राजेश डोंगरवार, तसेच संदीप टेम्भूर्णीकर समन्वयक,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र, गोंदिया; अनिकेत हंबर्डे,अभिषेक सिंघवी, निसारजोहरलाल लिल्लारे तसेच महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

blank