34.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home रोजगार/व्यापार युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी : वाशिममध्ये २२ जुलै रोजी रोजगार मेळावा

युवकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी : वाशिममध्ये २२ जुलै रोजी रोजगार मेळावा

0
18

वाशिम,दि.18 जुलै -जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम अंतर्गत मॉडेल करीयर सेंटर वाशिम व संमती अभियांत्रिकी महाविद्यालय वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता संमती अभियांत्रिकी महाविद्यालय सावरगाव बर्डे मालेगांव रोड वाशिम येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर रोजगार मेळाव्यात जिल्यातील व इतर जिल्यातील विविध कंपन्यांचे उद्योजक, नियोक्ता, प्लेसमेंट एजन्सी सहभागी होणार आहेत व त्याच दिवशी नियुक्ती मिळणार आहे. वाशिम जिल्यातील इच्छुक उमेदवारांनी सदर रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवीण वा. खंडारे, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र वाशिम अंतर्गत मॉडेल करीयर सेंटर वाशिम यांनी केले आहे.
आवश्यक पात्रता – इयत्ता १० वी व १२ वी पास, आयटीआय तसेच कोणत्याही शाखेचा पदवीधर अशा पात्रता असणाऱ्या बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी आहे. उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, बोयोदाटा, पासपोर्ट साईज फोटो सोबत आणणे आवश्यक असल्याचे प्र.वा. खंडारे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशिम यांनी कळविले आहे.