गोंदिया-डोळा हा मानवी शरीराचा मुख्य अवयव आहे.दृष्टी नसेल तर निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर जग पाहता येत नाही.परंतु, या अतिशय महत्वाच्या अवयवाची आपण काळजी घेत नाही.सध्या मोबाईल, इंटरनेट यामुळे जग खूप जवळ आले असले, तरी त्याच्यामुळे लोकांना अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.अंध लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने लोकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.भावी पिढीने अध:कारमय जग प्रकाशमान करण्यासाठी नेत्रदान करण्याबाबत आरोग्य विभागामार्फत जनजागृती करण्यावर विशेष जोर देण्यात येत आहे. मृतक सेवानिवृत्त शिक्षक भुरकन कटरे यांचे मृत्यू नंतर त्यांच्या परिवारातील सदस्यांनी लागलीच मृतकाचे नेत्रदान करुन मोलाचे काम करुन समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
दि.18 जुलै रोजी गोंदिया शहरातील सेवानिवृत्त शिक्षक भुरकन यशवंत कटरे वय 86 वर्षे यांचे मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारातील सदस्यांनी मृतकांचे नेत्रदान करण्याचे ठरवले. इतक्या कठीण परिस्थिती ही नेत्रदानाची इच्छा दर्शवली व घरातील परिवारातील
त्यांचे कुटुंबीय एन.बी कटरे सेवानिवृत्त शिक्षक,सहाय्यक प्राध्यापक जीएमसी गोंदिया येथील डॉ.राजेश फनींद्र कटरे,खोडशिवणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक विष्णू कटरे,ग्रामपंचायत कमरगावचे उपसरपंच धनराज भुरकन कटरे,विष्णू कटरे,देवराज कटरे, मनीषा राजेश कटरे, डॉ.दक्षा योगेश पटले,पुष्पा रहांगडाले यांच्या सहकार्याने समाजात नेत्रदानाविषयी जागरूकता वाढवण्याचे उदाहरण घालून दिले आहे. नेत्रदान हे जीवनदान आहे, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले.
दि. 18 जुलै 2025 रोजी त्यांच्या नेत्रांचे यशस्वी दान करण्याकरता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले,अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.तृप्ती कटरे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ.चंद्रकिशोर पारधी यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयाची चमू डॉ.रोहिणी जाधव,डॉ.अपूर्वा जैन,नेत्रदान समुपदेशक भाविका बघेले नागपुरे,नेत्रदान सहाय्यक रिता अरोरा यांच्या सहकार्यानी नेत्रदान प्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या या पवित्र कार्यामुळे दोन अंध व्यक्तींना नवी दृष्टी मिळणार आहे.शिक्षकी पेशात आयुष्य घालवलेल्या मृतक सेवानिवृत्त शिक्षक भुरकन कटरे यांनी मृत्यूनंतर देखील शिक्षण आणि सेवा याचेच दर्शन घडवले आहे. के.टी.एस.रुग्णालयातील नेत्र विभागाकडुन शासनामार्फत नेत्रदान केल्याबद्दल कटरे परिवाराला प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजित गोल्हार यांनी कटरे परिवाराने नेत्र दान केल्याबाबतचा आदर्श लोकांनी डोळ्यासमोर ठेवुन नेत्रदान करण्याचे आवाहन समस्त गोंदियावासियांना केलेले आहे.





